Pages

Sunday, 27 January 2013

Sorting चा किडा

जरा विचित्र topic आहे आज असं म्हणाल तुम्ही, पण आभ्यासाव्यातिरिक्त सध्या एवढंच एक काम सुरु आहे, म्हणून यावर लिहितोय. मी राहताना जरी भरपूर पसारा टाकत असलो, अस्ताव्यस्त गोष्टी सोडत असलो, तरी सुद्धा त्या केऑस मध्ये मला हव्या त्या गोष्टी व्यवस्थित सापडतात.(मी त्या टाकल्या नसून "ठेवल्या" असतात असे स्पष्टीकरण मी सतत देत असतो. आईला तर नेहेमीच!) थोडक्यात काय, तर मी भयानक पसारा घालतो- घरी माझी खोली सोडली, तर बाकी सगळं घर एकदम टापटीप असतं. माझ्या खोलीत मात्र तुम्ही शिरलात, की आपण लक्ष्मीनारायण यांचा बेस्ट चिवडा यातला एक घटक आहोत असं वाटलं तर त्यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही! हा-म्हणा पसारा घालणं चांगली गोष्ट नाही- मी स्वतःला या बाबतीत बरचसं सुधारलाय... पण ते म्हणतात ना...कुत्र्याचं शेपूट वाकडं... हे थोडं तसच आहे. हे झालं वरवरच्या गोष्टींबद्दल. तुम्हाला वाटेल की इतका पसारा आहे, म्हणजे पुस्तके, किंवा laptop मधले डाटा हा पण असाच असेल (सगळीकडेच ती tendancy असणार ना!) पण तसं अजिबात नाहीये. पुस्तकं आणि laptop मधला डाटा भयानक प्रकारे organized ठेवला असतो.

मुळात laptop हा मी तरी फक्त इमेल बघणं, गेम खेळणं आणि गाणी ऐकण्यासाठीच वापरतो. त्यामुळे या सर्व गोष्टी अगदी नित्यनेमाने sort करत बसतो. गेले २ दिवस हाच sortingचा किडा चावला आहे. मला मराठी गाणी खूप आवडतात. अगदी जुनी किर्लोसकरांनी चाल दिलेली असो, अथवा हल्ली अवधूत गुप्ते,सलील कुलकर्णी असो, मला सर्वच मराठी गाणी आवडतात. हे आवडणे फक्त चालीपर्यंत सीमित नसून त्या गाण्यामागची कविता जाणून घ्यायलासुद्धा मला तितकंच आवडतं. मध्यंतरी हार्ड डिस्क वर सेव केलेलं माझं २०००+ गाण्यांचं कलेक्शन हरवलं(हार्ड डिस्क crash झाली) आणि backup नसल्याने पुन्हा एकदा शून्यापासून ते निर्माण करायची गरज होती. आवडती अशी बरीच गाणी परत मिळवली. आता laptop वर भरपूर मराठी गाणी त्यामुळे आहेत- ७००-८०० आरामात असतीलपण. परंतु गाणी मिळवली की ती कोणत्याही प्रकारे नावं देऊन सेव होतात, आणि खरं सांगतो तुम्हाला ते भयानक गोक्यात जातं. साधं एक गाणं शोधायचं म्हणजे डोक्याला ताप! त्यावर उपाय म्हणून या वेळी एक नवीन गोष्ट करतोय- डीटेल sorting. गाणी, पुस्तकं, कविता, फोटो, अशा गोष्टी sort करत बसायला प्रचंड मजा येते. रविवारचा तो उद्योगच झाला आहे सध्या! (त्या निमित्ताने असलेला डाटा कानावर पडतो तरी!)

या वेळी sort करताना पुन्हा एकदा microsoft excel ची मदत घेतली आहे. यात "filter" नावाचा एक प्रचंड उपयोगाचा option आहे. खूप मोठ्या लिस्ट मधून तुम्हाला नेमके काय काय हवे आहे, ते तुम्ही मिळवू शकता.(आय टी क्षेत्रात काम केल्याने ज्या काही थोड्याफार चांगल्या गोष्टी शिकलो- त्यातच आहे हे- आणि आय टी वाल्यांना माहितीच असेल की "filter" केवढा उपयोगी आहे!) गाणं, गीतकार, स्वर, संगीतकार असे मुख्य columns आहेत, आणि त्या बरोबरच laptopवर फोल्डर उघडून शोधात बसण्यापेक्षा गाणं आणि गाण्याचे शब्द याच्या हायपरलिंक्स(तसं शोधायला सोपं आहे- पण D:\Chinmays Data\Marathi\Gaani  हे सर्व क्लिक करून आत जायचा आळस! असो!). गाण्याचे शब्द या साठी, कारण मला गाणी कविता म्हणून वाचायला पण तितकीच आवडतात. त्यासाठी आता कविनुसार अजून एक वेगळं sorting नको म्हणून! तसं पाहिला गेलात तर इंटरनेटवर आठवणीतली गाणी नावाचे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर प्रत्येक गीतकाराची गाणी, संगीतकाराची गाणी, आणि गायकाची गाणी, चित्रपटाची गाणी अशी sort करून ठेवली आहेत. मी अंगात खाज म्हणून स्वतः ते फक्त माझ्यासाठी करून ठेवतो आहे. हा- म्हणा आठवणीतली... वर अमुक एक संगीतकार, अमुक एक गीतकार आणि अमुक एक गायक असं डिटेल सर्च करता येत नाही. काये- आपल्या इथे गीतकार-संगीतकार बऱ्याच जोड्या हिट आहेत- म्हणजे बाबूजी-गदिमा, खळे-पाडगावकर, हृदयनाथ मंगेशकर-सुरेश भट/आरती प्रभू/ग्रेस, संदीप खरे- सलील कुलकर्णी इ. किंवा आशा बाईंनी बाबूजींची अनेक गाणी गायली आहेत- ती गाणी ऐकायचा मूड आला, तर हे sorting नक्कीच उपयोगी पडेल.

मध्यंतरी शास्त्रीय गायनाचे जे काही रेकॉर्डिंग होते, ते सगळे गायकाप्रमाणे sort केले आहेत. गायाकासोबतच माहित असल्यास सहकलाकारांची नवे सुद्धा दिली आहेत.(Live रेकॉर्डिंग असले तर नक्कीच!) तसेच त्या रेकॉर्डिंग मध्ये असणाऱ्या सर्व चीजा व बंदिशी दिल्या आहेत. बरेचदा शास्त्रीय गायक आहे स्वरावर लक्ष ठेऊन असल्यामुळे शब्दांकडे दुर्लक्ष करतो, आणि ते शब्द आपल्याला कधीही कळत नाहीत. ते कळावे, म्हणून मिळेल त्या source मधून बंदिशी, चीजा शोधत एक-एक रेकॉर्ड आता इन डीटेल सेव केली आहे. ५००+ रेकॉर्ड्स या प्रकारे हाताळून झाले आहेत- हे केल्याने खूप चांगलं संगीत कानावर पडलं. भीमसेन जोशी, किशोरी अमोणकर, अश्विनी भिडे-देशपांडे, मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, पंडित जसराज, व इतर कित्येक कलाकारांचे गाणे ऐकायला मिळाले. हो- हे सर्व करण्यात वेळ खूप जातो. पण मी तेवढा वेळ माझ्यासाठीच घालवायला तयार आहे. रोज ५-६ गाणी sort करायला आराध तास पुष्कळ आहे! गाण्यांचे शब्द आजकाल इंटरनेट वर दिले असतात. ते घ्यायचे, देवनागरी लिपीतून type करायचे, आणि excel मध्ये सेव करायचे! बस्स.

हे करत बसायला बहुदा माझं आयुष्य अपुरं पडणार आहे. सारखं नवीन मिळवून ऐकायचं- हे कायमच सुरु असतं. आणि काही आणलं, कि त्याची संख्या काही हजार या आकड्यात असते. नवीन सोडा- आत्ता असलेल्या डाटा पैकी २० टक्के डाटा sort करून झाला आहे, आणि हे सगळं गेले वर्ष- दीड वर्ष सुरु आहे. अजून हिंदी गाणी, मराठी नाट्यगीते आणि शास्त्रीय instrumentals याला हात पण लावला नाहीये! ते करायला तर काही वर्ष लागतील!! त्या नंतर जे नाहीये ते मिळवून sort करणं! चांगलंय- आयुष्यभरासाठीचा काहीतरी उद्योग लाऊन घेतला आहे. आत्ता फक्त दिवसातून ५ गाणी एवढंच आहे. नंतर वय वाढलं आणि मी आहे त्यापेक्षा वेडा झालो, की याची संख्या पण वाढेलच! असो- असतो एकेकाचा वेडेपणा. sorting करणं हा माझा वेडेपणा. विक्षिप्तपणा म्हणालात तरी चालेल! पण माझं frank opinion आहे- आयुष्य इतकं "chaotic" असताना आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या "ordered harmony" मध्ये असणं गरजेचं आहे. आजूबाजूला कितीही पसारा असला, तरी आवडती गोष्ट त्या पसाऱ्यातून लगेच सापडावी, मन रिफ्रेश करायचं असल्यास ती शोधात बसून चिडचिड करण्यापेक्षा आधीच "sort" करून ठेवली तरी  कुठे बिघडलं!


sort न केलेला डाटा (chaos)


sort केलेला शास्त्रीय गाण्याचा डाटा- चीजा/बंदिश सकट!


sort केलेला मराठी गाण्यांचा डाटा- हायपरलिंक्स सकट!

(एक सांगायलाच विसरलो- हे केल्याने multiple copies सगळ्या काढण्यात येतात- एका गाण्याची एकंच copy. शास्त्रीय संगीताच्या बाबतीत तर अतिशय महत्त्वाचे! :P!!)

No comments:

Post a Comment