Pages

Tuesday 10 April 2018

काही पुणेरी अफवा- एक अपूर्ण यादी,

१. टिळक टँकच्या खाली नैसर्गिक झरा आहे.

२. टिळक टँक अरबी समुद्राएवढा खोल आहे.

३.  कधी कधी टिळक टँक मध्ये देव मासा(व्हेल) सापडतो.

४. एकदा टिळक टँकमध्ये शार्क सापडला होता.

५. पर्वतीच्या देवदेवेश्वर मंदिरातून शनिवार वाड्याला जोडणारे एक भुयार आहे.

६. शनिवार वाड्यात अमावास्येला नारायणरावाचे भूत रघुनाथरावाला शोधताना दिसते.

७. शनिवारवाड्याच्या आत एक तोफ जमिनीत अर्धी गाडलेली आहे, कारण त्या तोफेच्या तोंडातून दुपारी १२ वाजता "काका मला वाचवा" असा आवाज यायचा. तोफेला कान लावला की ऐकू यायचा.

८. सदाशिव आणि शुक्रवार पेठांमधल्या जुन्या वाड्यांमध्ये क्रांतीकारकांना इंग्रजांपासून लपवून ठेवण्यासाठी गुप्त तळघर आणि वाडे जोडणारी भुयारं आहेत.

९.  खुन्या मुरलीधराला "खुन्या" नाव पडलं कारण चाफेकर बंधूनी द्रविडांना तिथे मारलं.

१०. पोलीस बाई एस पी कॉलेजमध्ये शिक्षिका होती. तिचा नवरा मेल्यावर तिला वेड लागलं.

११. दुर्गाच्या कोल्ड कॉफीत ७० टक्के पाणी असतं

१२. जे.व्ही.के एफवायला असताना त्यांचा ग्राफिक्स back राहिला होता. तेव्हा त्यांनी दाभाड्यांचं पूर्ण पुस्तक सोडवलं, आणि पुढच्या सेमेस्टरला ग्राफिक्स मध्ये १०० मार्क मिळवले, जो रेकोर्ड आज पर्यंत पुणे विद्यापीठात कोणीही मोडू शकलं नाहीये.

१३. A.B. de Villiers चं पूर्ण  नाव अप्पा बळवंत डी विलीअर्स आहे..

१४.

वरील मुद्दे काही पुणेरी अफवा आहेत. तुम्हाला अशा काही "पुणेरी" अफवा माहिती असतील तर सांगा.. टाकतो  या यादीत...यादी सध्यातरी अपूर्ण आहे... भूतकाळाला हळू हळू बाहेर काढलं की होईल यादी पूर्ण... गोष्टी आठवतील त्या क्रमांकात...

1 comment:

  1. एन एम कुलकर्णींच्या डायसखाली नोटा भरून ठेवलेल्या आहेत!

    ReplyDelete