Pages

Wednesday 21 July 2010

निर्धार

This is probably going to be my last post for some time now, as my GRE date is just over a month away! So wanted to bid a temorary farewell on a high.
Inspiration is what is the need of the hour now- especially for me, considering the monumental task that lies ahead . I am viewing it as yet another unconquered fort, ready to be annexed to the domain of forts already scaled. Such comparisons, for me, are a tremendous boost, as to conquer the fort, the inspiration provided by shivaji maharaj is always present. A difficult situation seems to be managible. Thats always the case.

And who else but Kusumagraj can incite you to draw inspiration from Shivaji Maharaj! The following poem, though not about Shivaji Maharaj, is about in essence the spirit of a Marathi Manus. I wont wast anymore time, and will directly post the poem. Forgive me if I have made any grammatical errors in typing, I am still not used to type Marathi on Gmail.

The Poem is named Nirdhaar, and is written by Kusumagraj.

निर्धार

समर भूमीचे सनदी मालक शत युद्धाचे मानकरी
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी!

घोरपडीला दोर लावूनी पहाड-दुर्गट चढलेले
तुटून पडता मस्तक खाली धुंद धाडणे लढलेले
खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले
बाप असे कलिकाळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी!
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी!

या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची
दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची
पहाड डोंगर इथे संगती अजिंक्यता अभिमानाची
जगदंबेचा पालव येथे लढ्वैय्यांच्या सदा शिरी
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी!

करवत का नस कोणी चालावो, पिकावो कोणी शेत मळा
कलम कागदावरी राबवो धरो कोणी हातात तुळा
करत कंकण असो कोणाच्या व भाळावर गंध टिळा
शिंग-मनोर्यावारी वाजता उभी छावणी घरोघरी!
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी!

पोलादी निर्धार अमुचा असुरबळाची खंत नसे
स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजयावाचून अंत नसे
श्रद्धा हृदयातील आमुची वाज्राहुनी बळवंत असे
मरण मारुनी पुढे निघाले गर्व तयांचा कोण हरी!
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी!

भारत भूमीचा वत्सल पालक देव मुनिनंचा पर्वत तो
रक्त दाबुनी उरत आम्हा आर्त स्वराने पुकारतो
"हे सह्याचाल, हे सातपुडा!" शब्द अंतर विदारतो
त्या रक्ताची, त्या शब्दाची शपथ अमुच्या जाले उरी!
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी!

जंगल जाळा परी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे!
वणव्याच्या आडदांड गतीला अडसर आता कुठला रे!
तळातळातुनी ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे!
स्वतंत्रतेचे निशाण आमुचे अजिंक्य राखू धरेवरी!
रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी!