१४व्य व १५व्या शतकात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अशी काही झाली होती, की चहुदिशांनी मूर्तीभंजकांच्या
टोळ्या संपूर्ण महाराष्ट्रभर हैदोस घालीत होत्या. जिहादच्या नावाखाली कत्तली करणं,
मंदिर पाडणं सदैव सुरूच होतं – याला खिलजी, तुघलक, बहामनी, आदिलशाही – सर्व सुलतानांनी
हातभार लावला. या कचाट्यातून ना देश वाचला, ना कोकण. त्यात, कोकणात Inquisitionच्या माध्यमातून फिरंग्यांचा(पोर्तुगीस) लोकांचा अजून अत्याचार सुरु झाला. या
धर्माद्वेशाचा अजून एक factor म्हणजे जंजिऱ्याचा सिद्धी. कोकणातल्या अनेक मंदिरांच्या
रचनेवरून आलेलं धर्मसंकट दिसून येतं. अनेक मंदिरे दुरून माशिदिसारखी दिसतात. काही
तर सर्वसामान्य घरंच वाटतात.
 |
| कुलदैवत- श्री कोळेश्वर, कोळथरे- लांबून हे मंदिर मशीद वाटू शकते. |
आत्ताच्या
कोकण ट्रीप दरम्यान २ अशी ठिकाणे बघितली. यातील पहिली, म्हणजे मुरुडची
दुर्गा देवी. या देवीचे मंदिर पेशवेकालीन आहे. अतिशय सुंदर लाकडात कोरलेलं. पण
मूर्ती मुळची तिथली वाटत नाही. गंडकीशिळेतून घडवलेली ही नितांत सुंदर मूर्ती
कर्नाटकात पाहिलेल्या काही मूर्तींसारखी वाटते. देवीला कायम साडी नेसवलेली आहे, त्यामुळे, हा फक्त अंदाज आहे. पण एक गोष्ट नक्की- की मूळ मूर्ती
इथली नाही. ती इथे कधी, कोणी आणली, याची कल्पना नाही. मंदिराचा इतिहास १०००-१२००
वर्षांपूर्वीचा आहे. तिथे एक स्वयंभू देवी देखील आहे, जी लिंगस्वरूपी आहे.
 |
| मुरुड ची दुर्गादेवी |
अशीच अजून एक
श्री विष्णुची मूर्ती सापडली. एका आडमार्गावर हिंडत असताना एक फाटा आत जाताना
दिसला. सहज बघितलं, तर एक्भार्पूर पाणी असलेला छोटा धबधबा- आणि एक शांत डोह.
त्याच्याबाजूला एक छोटं घर. बाहेर तुळशीवृंदावन, काही
तुटलेल्या वीरघळी. जवळ गेल्यावर लक्षात आले, हे मंदिर आहे.
आत डोकावून पाहिले, तर एक नितांत सुंदर विष्णूची मूर्ती. इतक्या साध्या मंदिरात
इतकी सुंदर मूर्ती असणं अतिशय विसंगत वाटतं. तिथे इतर काही अवशेष पण नाहीत, जेणेकरून आधी मोठं मंदिर असावं याच्या खुणा मिळाव्यात. नक्कीच, धर्मांध टोळ्यांपासून संरक्षणार्थ ही मूर्ती
इथे आणली आहे. जागा पण अशी आहे, की सहजासहजी कोणी येणार नाही. मूर्ती
कदंब/चालुक्य काळातील वाटते – माझं या विषयाबद्दल फार वाचन नाही- त्यामुळे हा
माझा फक्त अंदाज आहे. कोणाला माहिती असल्यास जरूर सांगावे. पण काहीही असो – स्थळ,
परिसर व मूर्ती अतिशय सुंदर आहे. जास्त लिहित नाही- तुम्हीच बघा- आणि ठरवा...
 |
| विष्णु मंदिरामागे छोटास धबधबा व डोह |
 |
| श्री विष्णु |
 |
| श्री विष्णु |
 |
| विष्णु मंदिर परिसर. वरील विष्णु मूर्ती या मंदिरात आहे. |
एक मात्र
नक्की. आपले देव, त्यांच्या रक्षणार्थ स्थलांतरित केले गेले आहेत – आणि
म्हणूनच एरवी समुद्रापलीकडे न बघितलेल्या कोकणाच्या मेखालेतली ही दुसरी
कडी- हा दुसरा पैलू- Flight Of the Deities
(मंदिराचे स्थळ
मुद्दाम देत नाहीये. हरवलेलं कोकण तसंच राहावं ही त्या मागची भावना- जायचं झाल्यास
जागा हुडकून काढा..)
No comments:
Post a Comment