Pages

Monday, 16 September 2024

पौराणिक अयोध्या- एक वेगळा प्रयत्न

 ॥ॐ

विद्यावन्तं विपुलमतिदं वेदवेदांगवेद्यं
श्रेष्ठं शान्तं शमितविषयं शुद्धतेजोविशालम्।
वेदव्यासं सततविनतं विश्ववेद्यैकयोनिं
पाराशर्य्यं परमपुरुषं सर्वदाऽहं नमामि॥

रामजन्मभूमी आंदोलनाची फलश्रुती असणाऱ्या भव्य राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळेस इंस्ताग्राम, फेसबुक व इतर सर्व माध्यमांवर राममन्दिराविषयी विविध चर्चा सुरु होत्या. राम भजनांचा एकच नाद दशदिशांत उठला होता. संपूर्ण वातावरण राममय झाले होतें. श्रीराम प्रेरणेने सर्वजण नवीन काहीतरी करू पहात होतें. कलाकार, मूर्तिकार, गायक, वादक, नर्तिका, अभ्यासक, लेखक - जो तो आपल्यापरीने नवनिर्मितीचा खटाटोप करत होता. देशभर उठलेल्या या भक्तीसागरात जो तो डुबकी मारून प्रेरणा घेऊनच बाहेर येत होता. या सर्वांप्रमाणेच मी देखील त्या भक्तीसागरात एक डुबकी मारून स्वतःपुरता का होईना, एक छोटासा प्रयोग केलाच होता – तो म्हणजे इतिहास आणि पुराण यातून आलेल्या अयोध्या वर्णनाच्या आधारे त्या काळच्या अयोध्येच्या खाणाखुणा आजच्या नकाशावर टिपण्याचा. साथीला होते माझे २ आवडते सहायक – Google Earth Pro आणि ChatGPT. मागे एकदा स्कंदपुराणाचे भाषांतर वाचताना त्यात “अयोध्या महात्म्य” असा एक उल्लेख पहिला होता- तो खंड वरवर चाळल्यावर त्यात अयोध्या यात्रेविषयी माहिती होती हे लक्षात आले. आता त्याचा खोलवर अभ्यास करून स्कंदपुराणाचा आधार घेत, पुराणकाळातील अयोध्या कशी होती हा प्रश्न सोडवायला घेतला.

सूताकडून अयोध्या महात्म्य ऐकताना भारद्वाज ऋषि आश्रमातले मुनी

भारद्वाज ऋषींच्या आश्रमात कथन सुरु करताना, “केन वर्णयितुं शक्यो महिमाऽस्यास्तपोधन” म्हणत अगस्तींना जिथे शब्द अपुरे पडतात, त्याच अयोध्येचे वर्णन सूत मात्र फार सुंदर करतो. सूत म्हणतो:

सरयूतीरमासाद्य दिव्या परमशोभना ।
अमरावतीनिभा प्रायः श्रिता बहुतपोधनैः ॥ ३१ ॥
हस्त्यश्वरथपत्त्याढ्या संपदुच्चा च संस्थिता ।
प्राकाराढ्यप्रतोलीभिस्तोरणैः कांचनप्रभैः ॥ ३२ ॥
सानूपवेषैः सर्वत्र सुविभक्तचतुष्टया ।
अनेकभूमिप्रासादा बहुभित्तिसुविक्रिया ॥ ३३ ॥
पद्मोत्फुल्लशुभोदाभिर्वापीभिरुपशोभिता ।
देवतायतनैर्दिव्यैर्वेदघोषैश्च मण्डिता ॥ ३४ ॥
वीणावेणुमृदंगादिशब्दैरुत्कृष्टतां गता ।
शालैस्तालैर्नालिकेरैः पनसामलकैस्तथा ॥ ३५ ॥
तथैवाम्रकपित्थाद्यैरशोकैरुपशोभिता ।
आरामैर्विविधैर्युक्ता सर्वर्तुफलपादपैः ॥ ३६ ॥
मालतीजातिबकुलपाटलीनागचंपकैः ।
करवीरैः कर्णिकारैः केतकीभिरलंकृता ॥ ३७ ॥
निम्बजंवीरकदलीमातुलिंगमहाफलैः ।
लसच्चंदनगंधाढ्यैर्नागरैरुपशोभिता ॥ ३८ ॥
देवतुल्यप्रभायुक्तैर्नृपपुत्रैश्च संयुता ।
सुरूपाभिर्वरस्त्रीभिर्देवस्त्रीभिरिवावृता ॥ ३९ ॥
श्रेष्ठैः सत्कविभिर्युक्ता बृहस्पतिसमैर्द्विजैः ।
वणिग्जनैस्तथा पौरैः कल्पवृक्षैरिवावृता ॥ ४० ॥
अश्वैरुच्चैःश्रवस्तुल्यैर्दंतिभिर्दिग्गजैरिव ।
इति नानाविधैर्भावैरुपेतेन्द्रपुरी समा ॥ ४१ ॥
यस्यां जाता महीपालाः सूर्यवंशसमुद्भवाः ।
इक्ष्वाकुप्रमुखाः सर्वे प्रजापालनतत्पराः ॥ ४२ ॥

गदिमाकृत “सरयू तीरावरी अयोध्या” हे काव्य अजरामर आहे – त्यामुळे सूताने केलेल्या वर्णनाचा पद्यानुवाद मराठीत न करता इंग्रजीतून करावाअसे वाटले. अर्थातच, मदतीला होता ChatGPT. वेळोवेळी त्याला वेगवेगळे prompts देऊन खालील पद्यानुवाद करवून घेतला. (अर्थातच एक प्रयोग म्हणून)

By Saryu’s shore, so radiant,
A city shines in grand ascent,
Resembling Amravati’s grace,
Where wealthy men in splendor place.

With chariots, horses, armies vast,
Through towering gates her people pass,
Golden arches gleam on high,
Her mighty walls stretch to the sky.

Broad streets, well-planned in perfect squares,
Tall buildings rise with endless stairs,
Each with rooms so finely wrought,
Strong pillars hold their seamless thought.

The ponds with lotus blooms aglow,
Make rippling waters gently flow,
With temples grand where prayers resound,
And chants of Vedas all around.

The veena's notes and flutes resound,
The drums and music most profound,
With shady trees that line the way,
From jackfruit, mangoes, and palms that sway.

Amidst the gardens, blossoms rare—
Ashoka, mango, all trees fair,
With blooming flowers rich and bright,
Champa, jasmine, in pure delight.

Karavira, Ketaki bloom,
Their fragrance fills each grand room,
Laden with fruits like lemons sweet,
Bananas, sandalwoods replete.

Princes like gods, in valor bold,
And women fair with beauty untold,
Graceful like the heavens above,
Surround this place of peace and love.

The learned Brahmins, wise and great,
With poets whom the gods await,
Merchants rich with endless store,
This city thrives forevermore.

Her steeds, like Uchchaihshravas grand,
Her elephants rule every land,
Her many forms in splendor gleam,
A match for Indra's golden dream.

For kings are born within her walls,
Of solar race, they heed the calls,
Ikshvaku leads the noble line,
Protecting all in duty fine.

Thus shines the city on the shore,
A realm of wealth and wisdom’s lore.

अयोध्या

Geographical अयोध्या

या अयोध्या माहात्म्यात पुढे बऱ्याच कथा आहेत, स्थल वर्णनं, तीर्थ वर्णनं, तसेच Geographical indicators आहेत. अगस्ती आणि व्यास यांच्यातील संवादात आलेल्या याच indicators आणि markersचा उपयोग करत “Geographical अयोध्या” हा दुसरा प्रयत्न सुरु झाला.

सहस्रधारामारभ्य योजनं पूर्वतो दिशि ।
प्रतीचि दिशि तथैव योजनं समतोवधिः ॥ ६४ ॥
दक्षिणोत्तरभागे तु सरयूतमसावधिः ।
एतत्क्षेत्रस्य संस्थानं हरेरन्तर्गृहं स्थितम् ॥ ६५ ॥
मत्स्याकृतिरियं विप्र पुरी विष्णोरुदीरिता ।
पश्चिमे तस्य मूर्द्धा तु गोप्रतारासिता द्विज ॥६६ ॥
पूर्वतः पृष्ठभागो हि दक्षिणोत्तरमध्यमः ।
तस्यां पुर्य्यां महाभाग नाम्ना विष्णुर्हरिः स्वयम् ।
पूर्वंदृष्टप्रभावोऽसौ प्राधान्येन वसत्यपि ॥ ६७ ॥

"Starting from the source of the thousand streams, she stretches for a yojana to the east,
And likewise, another yojana to the west, expanding evenly.""In the south and north, the sacred Sarayū
and Tamsa marks her boundary, This region is Viṣṇu's abode, shaped like a fish (Matsya) as described in the scriptures." "To the west lies her head, marked by the sacred crossing known as Gopratāra, O wise one." "To the east is her back, and her middle extends from north to south,
In this great city, Viṣṇu, also known as Hari, dwells with supreme prominence and his past glories are ever visible."

पुढे, अयोध्येतील तीर्थ, मंदिरे, कुंड यांचे तपशील आहेत. प्रत्येक तीर्थाची, कुंडाची ,मंदिराची वेगळी गोष्ट आहे. वेळ मिळेल तशी प्रत्येक कथा त्या त्या तीर्थाला hyperlink करून देईन. अयोध्येतील तीर्थांची यादी:

Tirtha

Reference

distance

direction

विष्णुहरी

--

 

 

ब्रह्म कुंड

चक्रतीर्थ

?

E

ऋणमोचन तीर्थ

ब्रह्म कुंड

700 धनु

NE

पापमोचन तीर्थ

ऋणमोचन

200 धनु

E

सहस्रधारा

पापमोचन

100 धनु

E

स्वर्गद्वार

चंद्र्हरी

सहस्रधारा

636 धनु

E

धर्महरी

चांद्राहरी

?

SE

स्वर्णखणी

धर्महरी

?

S

तिलोदकी संगम

स्वर्णखणी

?

S

सीताकुंड

तिलोदकी संगम

W

चक्रहरी

विष्णुहरी

?

W

हरीस्मृती

चक्रहरी

?

W

शरयू-घर्घरा संगम

गुप्तहरी

3 yojana

W

गोप्रतर

 ??

??

??

क्षीरोदक

सिताकुंड

 

NW

बृहस्पती कुंड

क्षीरोदक कुंड

 

SW

रुक्मिणी कुंड

बृहस्पती कुंड

 

S

धनयक्ष

रुक्मिणी कुंड

 

NW

वशिष्ठ कुंड

धनयक्ष

 

N

सागर कुंड

वशिष्ठ कुंड

 

W

योगिनी कुंड

सागर कुंड

 

SW

उर्वशी कुंड

योगिनी कुंड

 

E

घोषार्क कुंड

उर्वशी कुंड

 

S

रती कुंड

घोषार्क कुंड

 

W

कुसुमयुध कुंड

रती कुंड

 

W

मंत्रेश्वर

कुसुमयुध कुंड

 

W

शितलादेवी

मंत्रेश्वर

 

N

बन्दीदेवी

शितलादेवी

 

N

चुडकीदेवी

बन्दीदेवी

 

N

महारात्न

चुडकीदेवी

 

E

दुर्भर सरोवर

महारात्न

 

SW

महाभार सर्वोवर

महारात्न

 

SW

महाविद्या/ सिद्धपीठ

दुर्भर 

 

NW

क्षीरकुंड

 ??    

 ??

 ??

तपोनिधी तीर्थ

क्षीरकुंड

 

E

हनुमान कुंड

तपोनिधी

 

W

विभीषण सरस

हनुमान कुंड

 

W

गया कूप

जटा तीर्थ

 

SE

पिशाच्चमोचन तीर्थ

गया कूप

 

E

मानस तीर्थ

पिशाच्चमोचन

 

E

तामसा नदी

मानस तीर्थ

 

S

मांडव्य आश्रम

तामसा नदी

 

 

गौतम आश्रम

मांडव्य आश्रम

 

E

च्यावन आश्रम

गौतम आश्रम

 

E

सीताकुंद/दुग्धेश्वर

तामसा नदी

 

 

भैरव

सीताकुंद

 

S

भरत कुंड

भैरव

 

N

जटा कुंड

भरत कुंड

 

W

अमृत कुंड

 

 

 

नंदीग्राम

 

 

 

विराटतीर्थ

Jatakunda

 

N

सुरस

Viratirtha

 

S

पिंडारक

Surasa

 

W

विघ्नेश्वर

Pindaraka

 

W

रामजन्मभूमी

विघ्नेश्वर

 

E

रामजन्मभूमी

पिंडारक

 

NE

रामजन्मभूमी

लौमष

 

W

यातील अनेक स्थळे GoogleEarth/ Wikimapia इथे सापडली, त्यांचा आधार घेऊन जेवढे markers अचूक लावता येत होतें – te लावले. काहींचा अनुमान लावला – जसे – सहस्रधारा असा उल्लेख कुठे सापडला नाही. परंतु- या ठिकाणी लक्ष्मणाने प्राणत्याग केला होता, त्यामुळे लक्ष्मणाशी जोडणारी वास्तू शोधात होतो – अर्थातच, “पापमोचनघाट” या जवळ लक्ष्मण घाट आणि लक्ष्मण कीला सापडले – हेच सहस्रधारा असणार. भारतात अनेक ठिकाणी सहस्रधारा आहेत – नदीपात्रातील खडकांमुळे नदी सहस्र धारांमध्ये विभागली जाते- म्हणूनच हे नाव! अर्थात काळाच्या ओघात हे खडक झिजून, ती सहस्रधार नाहीशी होते. अयोध्येत हे झालेले दिसते. या पलीकडे, काळाच्या ओघात अयोध्येनजिक शरयू नदीने आपला प्रवाह बदलला आहे- किंबहुना- या नदीने अनेकदा प्रवाह बदलला असणार – यादीत आलेले विभीषण सरोवर, व दुर्भर, महाभार सरोवर हे शरयु नदीच्या जुन्या प्रवाहाचे उरलेले अवशेष असणार (Ox Bow Lake). तिलोदकी नावाची एक नदी देखील आहे- ही पण शरयू नदीचा एखादा paleo channel असणार.

विष्णुहरी शिलालेख

मानव निर्मित तीर्थांचा आणि मंदिरांचा अंदाज घेऊ शकतो – आजच्या अयोधेय्त विष्णुहरी, चंद्र्हरी. धर्महरी, दुग्धेश्वर, मंत्रेश्वर, विघ्नेश्वर दिसत नाहीत. बाबरी मशीद पाडल्यानंतर पुरातत्व खात्याला जे काही पुरावे सापडले – त्यात एक विष्णुहरी शिलालेख आहे. हा तेव्हाच्या विष्णुहरी मंदिराचाच का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. यातला धर्महरी म्हणजे त्रेता-का-ठाकूर का? गुप्तहरी दिसत नाही – हाच आजचा गुप्तार घाट का? असे अनेक प्रश्न आहेत- बहुदा त्याची उत्तरे अयोध्या दर्शनानेच सोडवता येतील!


आजच्या अयोध्या- फैजाबादचा नकाशा. आजदेखील हा भाग काहीसा मत्स्याकृती वाटतो - (निळ्या रेषेतला शरयू चा जुना प्रवाह बघितला तर!). अनेक तीर्थ/ कुंड सापडतात. नकाशाची .kmz file इथे देत आहे.

यादीत दिलेली सर्व ठिकाणे नकाशात सापडत नव्हती, म्हणून, वर्णन आधारित एक Fantasy Map बनवावा असा विचार आला. Caesar3/Pharoah या city-building games च्या मदतीने अयोध्येचा ३D interface बनवण्याचा प्रयत्न अजून सुरु आहे - परंतु, नकाशा बनवायचे समाधान मिळावे म्हणून Inkarnate या वेबसाईटच्या मदतीने अयोध्येचा हा नकाशा बनवण्याचा प्रयत्न केला आहे.


(नुसता नकाशा न लावता त्यावर लिही हे प्रोत्साहन देण्यासाठी अनंत दादाचे खूप आभार! )

सर्व चित्र – ChatGPT कृत

स्कन्दपुराण: https://www.wisdomlib.org/hinduism/book/skanda-purana-sanskrit/d/doc730029.html

2 comments:

  1. अंतराची परिमाणे वायू पुराणात पाहून घ्या. शिर्षक>> चतुराश्रमविभाग>>श्लोक ९९ आणि त्यापुढे...

    ReplyDelete
  2. लेख अतिशय अभ्यासपूर्ण आहे. तत्कालिन व सद्यकालिन भौगोलिक विवरणांची सांगड घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे उत्कंठावर्धक झाला आहे. अंतराची परिमाणे वायू पुराणात पाहून घ्या. शिर्षक>> चतुराश्रमविभाग>>श्लोक ९९ आणि त्यापुढे...

    ReplyDelete