Pages

Showing posts with label kavita. Show all posts
Showing posts with label kavita. Show all posts

Wednesday, 12 April 2017

शाल्मलीखालचा महादेव



सह्याद्रीतल्या एका डोंगराच्या पायथ्याशी 
एका उंच निष्पर्ण झाडाखाली 
जुनाट किरकिरं घर कोणाचं 
म्हणून पाहायला गेलो-
तर काय आश्चर्य म्हणून सांगू !

तीर्थक्षेत्री मोठमोठ्या मंदिरांमधून 
दुधाच्या, दह्याच्या  भडीमाराने
लॅक्टोज इंटाॅलरन्स झालेला महादेव,
अंगणात गुलाबी फुलांचा सडा टाकून
निवांत पहुडला होता आतमध्ये-
 जगावर पुष्पवृष्टी करत...

सह्याद्रीमंडळात या महादेवाची
अजून अशी किती घरं...
कोणास ठाऊक ...