Pages

Friday 19 June 2009

शिवराज्याभिषेक

Independence is a hard thing to achieve, especially if you are ruled by those who have what it takes to oppress you in any circumstance. It takes immense efforts to attain independence in such situations. It requires courage, strength, endurance, and to the extreme, even the readiness to give up ones life for the cause. And when those efforts are paid off, the fleeting feeling is altogether different. Rather there is no feeling like that.

Shivaji Maharaj's entire life had been a struggle. A struggle to preserve our lands, our culture, our traditions, and last but the most important- our Dharma. i have obtained an extract from Shivshahir Babasaheb Purandare' book Janata Raja. It is about the emotions that were running through the mind of the common Marathi people, after the coronation os Shivaji Maharaj. It is immensely captivating. i have a tear in my eye every time i read it- a tear of joy. Aanandashru as they call it. It gives a vivid image- I feel like i was at the ceremony 350 years ago. Its worth sharing. Those who are proud owners of the cassette series of Shivacharitra Kathan, will find this in the 15th cassette "Rajyabhishek". Have a go through it anyway.




महाराष्ट्रात पुन्हा अयोध्या अवतरली. न्यायाचे, सद्धार्माचे, सुसंस्कृतिचे छत्रसिंहासन पुन्हा प्रकटले. साडेतीनशे वर्षांचे सुतक फिटले . सारी विशण्णता, नैराश्य, दुःख लयाला गेले. सार्या जखमा बुजल्या. सारे अपमान धुऊन निघाले. सर्वत्र आनंदी-आनंद उडाला. नव्या जीवनाचा साक्षात्कार सर्वांस झाला. सर्व संशय व भये पळाली. न्यायासाठी, संरक्षणासाठी, सुखदुःखे सांगण्यासाठी, हवे ते हक्कानी मागण्यासाठी ममतेचे, समतेचे उदार आणि बलाढ्य सिंहासन निर्माण झाले. सावलीसाठी विशाल छात्र उघडले गेले. मुलबाळांस, लेकीसुनांस शेतकार्यांस हक्काने रुसावयास जागा निर्माण झाली. अवघ्यांना आजोळ-माहेर लाभले. महाराष्ट्रात आनंदसंवत्सर उगवले. सृष्टि डोलू लागली. सह्याद्रीला हर्षवायु झाला. स्मुद्रमंथानात देवानांही जे मिळाले नाही असे अपूर्व रत्ना महाराष्ट्राला मिळाले- सिंहासन! समुद्र तळापासून उचंबळला. सह्याद्रीचे सारे जिवलग आनंदाने हिंदोळले

---- आणि सह्याद्रीच्या एक गुहेतला एक तेजःपुंज योगी पुरूष एक हाती कुबडी आणि दुसर्या हाती जपमाळ उंचावीत आनंदाने उसळून गर्जत गर्जत बाहेर आला! अवघा आनंदी-आनंद त्याच्या मुखावर उसळत होता! तो मोठ्याने गर्जत होता ---


स्वप्नी
जे देखिले रात्रीँ। तें तें तैसेचि होतसे
हिंडता फिरता गेलों । आनंदवनभूवनीं
स्वधर्माआड जी विघ्नें। तीं तीं सर्वत्र ऊठिलि
लाटिलीं कुटिलीं देवे। दपिलीं, कापिलीं बहु
विघ्नाच्या उठिल्या फौज। भीम त्यावरी लोटला
भर्डिलीं चिर्डिलीं रांगे। रडविलीं, बडविलीं बळें
खौळले लोक देवाचे। मुख्या देवची उठिला
कळेना काय रे होतें। आनंदवनभूवनीं
स्वर्गीची लोटिली जेथे। रामगंगा महानदी
तीर्थासी तूळणा नाही।आनंदवनभूवनीं
त्रैलोक्य चालिल्या फौजा। सौख्य बंदिविमोचनें
मोहिम मांडिली मोठी। आनंदवनभूवनीं
अनेक वाजती वाद्ये। ध्वनिकल्लोळ उठिला
छाबिने डोलती ढाला। आनंदवनभूवनीं
कल्पांत मांडिला मोठा। म्लेंछादैत्य बुडावाया
कैपक्षा घेतला देवीं। आनंदवनभूवनीं
बुडाले सर्वही पापी। हिन्दुस्थान बळावले
अभक्तांचा क्षयो जाला। आनंदवनभूवनीं
येथून वाढला धर्मु। रमाधर्म समागमे
संतोष मांडिला मोठा। आनंदवनभूवनीं
बुडाला औरंगया पापी। म्लेंछासंहार जाहला
मोडिली मांडिली क्षेत्रे। आनंदवनभूवनीं
उदंड जाहलें पाणी| स्नानसंध्या करावाया
जपतप अनुष्ठाने। आनंदवनभूवनीं
लिहिला प्रत्ययो आला। मोठा आनंद जाहला
चढता वाढता प्रेमा। आनंदवनभूवनीं
बंड पाषांड उडाले। शुद्ध अध्यात्मा वाढले
राम कर्ता राम भोक्ता। आनंदवनभूवनीं
देवालये दीपमाळा।रंगमाळा बहुविधा
पूजिला देव देवांचा। आनंदवनभूवनीं
गीत सांगती सामर्थ्यें। वाद्याकल्लोळ ऊठिला
मिळाले सर्व अर्थार्थीँ। आनंदवनभूवनीं
येथुनी वाचती सर्वें। ते ते सर्वत्र देखती
सामर्थ्य काय बोलावे। आनंदवनभूवनीं


केवढा हा प्रचितीचा आनंद! विरक्त योगी-बैरागीहि आनंदले. सर्वच आनंदले. ऋतु, नक्षत्रे, मेघ, आकाश, वरुण हेहि आनंदले, भारावले, गहिवरले आणि त्यानी आपल्या आनंदाश्रुंची बरसात सुरु केलि.

रायगड पर्जन्य धारंखाली न्हाऊन निघू लागला. आकाशांतून सहस्राविधि कलाशातून जणू देवनृपति इंद्राने वृष्टि सुरु केली. आस्मनात मेघांच्या दुंदुभी दाणाणत होत्या. रायगडाच्या नागार्खान्यतही दुंदुभी दाणाणत होत्या। अवघी राजसभाच गर्जत होती " शिवाजी महाराज की जय!" "तुळजा भवानी की जय!"- काहीच दिसत नव्हते, फक्त ऐकू येत होते! काहीच ऐकू येत नव्हते, फक्त दिसत होते!

No comments:

Post a Comment