Recently i was reading a book called "Rasayaatra". its a collection of poems by कुसुमाग्रज.
now as it happens, kusumagraj is my most adored marathi poets, along with Savarkar and govindagraj and baalkavi. this book is a beautiful collection of poems from his various works.
there are a number of unforgettable poems. "Columbasache Garvageet", "Swapnachi Samapti", and "door manoryaat". but, as it stands, for me, the best one is "Saat". literally translated into english, it means "Seven", and is a poem about the foolish, yet extremely brave feat of Sarsenapati Pratarao Gujar. it brings upon me an awe and a tear every time i read this poem.
Here i present to you "Saat" by Kusumagraj.
वेडात मराठे वीर दौडले सात!
" श्रुति धन्य जाहल्या श्रवुनि आपुली वार्ता!
रण सोडुनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतिल आता!
भर दिवसा आम्हा दिसू लागली रात"
वेडात मराठे वीर दौडले सात!
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
"माघारी वळणे नाही मराठी शील
विसरलात महाशय काय लाविता जात?"
वेडात मराठे वीर दौडले सात!
वर भिवई चढली दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंदाची गाठ
डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ
म्यानातुन उसळें तरवारिची पात!
वेडात मराठे वीर दौडले सात!
" जरि काल दाविली प्रभु, गनिमांना पाठ
जरि काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज आरी-शिबिरांत
तव मानकरी हा घेउनी शीर करात"
वेडात मराठे वीर दौडले सात!
ते फिरता बाजुस डोळे किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळिचे मेघ सात निमिषात
वेडात मराठे वीर दौडले सात!
आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यांत
वेडात मराठे वीर दौडले सात!
खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी,
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात!
दगडावर दिसतील अजुनी तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणि वार्यावर गात

सात
कुसुमाग्रज

majhi pan ayushyatli avadti kavita ahe hi!
ReplyDeletehttp://en.wikipedia.org/wiki/Prataprao_Gujar
ReplyDeletereally wonderful..
Can anyone translate this please inspiring song
ReplyDelete