Pages

Thursday, 4 September 2014

Sawai Madhavravacha Rang

The following is a "phatka" a type of peom written by Veer Savarkar describing the Rangapanchami festival when Sawai Madhavrao was the Peshwa. The phatka gives a brief description of Pune and an imaginary route taken by the Peshwa to play colour with the citizens.

Sawai Madhavrao Peshwa is known for constructing the famous "Talyatla Ganapati" Temple in Sarasbag.
Painting by Mohan Jadhav.

It may be worth to note that Savarkar had written this phatka when he was only 11 years old, and had never ever visited Pune before to know its areas firsthand... What do 11 years old of today do? A general question...

Painting of Sawai Madhavrao at Parvati.

धन्य कुलामध्ये धनी सवाई, भाग्य धन्यची रायाचे
सेवक हाती यशस्वी असती पुण्य किती त्या पायाचे...
श्रीमंतांचे भाग्यप्रतापे द्वादश वर्षे बहु श्रमले
अटकेला जरी पटका रोविती पुन्हा सर्वजण चट नमले...
जिकडे तिकडे नाम पेशवे, काळ शत्रूसी वाटुनिया
प्रजेत झाली बहु शांतता रिपू सर्व हे हटूनिया....

नाच शिकारी रंग तमाशे प्रजेत होती नित्य पहा
श्रीमंतांनी बेत ठरवला रंग करावा असा महा
या याचाकल पाहून सर्वही लेकी सत्वर होकारा
हर्ष होतसे वर्षप्रतिपदे पुण्यात झाला फुत्कारा...
हत्ती घोडे फौज असा हा समाज सर्वही मेळाला
आज्ञा किली श्रीमंते मग सुरवात करा खेळाला...

पुढे विलसते मुख्य स्वारी सवे थाट अंबाऱ्यांचा
चंद्रबिंब श्रीमंत अवांतर प्रकाश पडला ताऱ्यांचा
पिचाकाऱ्यांचा मार तेधवा फार जाहला बुधवारी
स्वारी कापड आळीतुनी खेळत आली रविवारी....
सलाम मुजरे सर्व राहिले दंग जाहले रंगानी
द्वापारी जसे रंग करविले भगवान श्रीरंगानी...

हरीपंतांचे वाड्यापाशी रंग केशरी उडवुनिया
स्वारी गेली नागझरीतून रंग केशरी तुडवुनिया
रास्ते यांचे पेठेमध्ये पाट लागले रस्त्यांनी
गच्ची वरुनी बंब लावूनी रंग उडविला रास्त्यांनी...
शहरी भिजविले कैक बंगले, चौक गुलाले रंगांनी
द्वापारी जसे गुंग भिजविले भगवान श्रीरंगानी...

झुकत झुकत समुदाय चालती स्वारी ये मग वानवडी
नंतर रंगा आरंभ झाला नाच होऊनी दोन घडी...
दो दो हाती गुलाल गळती लाल छत दिसे उन्हात
हास्यवदन मग राव शोभती शूर शिपाई वृंदात...
लाखो हौदे उडू लागले पिचकाऱ्यांचा मार अती
झाली रे झाली गर्दी एकची वर्णावी ती पहा किती...

-सावरकर.(वय वर्ष ११ असताना)

No comments:

Post a Comment