Pages

Wednesday, 12 April 2017

शाल्मलीखालचा महादेवसह्याद्रीतल्या एका डोंगराच्या पायथ्याशी 
एका उंच निष्पर्ण झाडाखाली सहजच
जुनाट किरकिरं घर कोणाचं म्हणून पाहायला गेलो-
तर काय आश्चर्य म्हणून सांगू तुम्हाला!!

तीर्थक्षेत्री मोठमोठ्या मंदिरांमधून 
दुधाच्या, दह्याच्या  भडीमाराने
लॅक्टोज इंटाॅलरन्स झालेला महादेव,
अंगणात गुलाबी फुलांचा सडा टाकून
निवांत पहुडला होता आतमध्ये-
कर्मकांडात अडकलेल्या जगावर
 शाल्मलीची पुष्पवृष्टी करत...

सह्याद्रीमंडळात या महादेवाची
कोणास ठाऊक ...
अजून अशी किती घरं...

1 comment: