Pages

Tuesday, 11 August 2009

दूर मनो-यातदूर मनो-यात (door manoryat)

वादळला हा जीवनसागर - अवसेची रात
पाण्यावर गडबडा लोळतो रुसलेला वात

भांबावुनी अभ्रांच्या गर्दित गुदमरल्य तारा
सूडाने तडतडा फाडतो उभे शीड वारा

 
पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवताली
प्रचण्ड भिंगापरी फुटते जळ आदळुनी खाली

प्रवासास गल्बते आपुली अशा काळराती
वावटळीतिल पिसाप्रमणे हेलावत जाती

परन्तु अन्धारात चकाके बघा बन्दरात
स्तम्भावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शान्त!

किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी
काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी

उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनो-यात
अन् लावा ह्रुदयात सख्यांनो, आशेची वात!

-कुसुमाग्रज.

one of my recent favourite ones. just amazing. especially the kiranancha ughadoon pisara... part.

No comments:

Post a Comment