Pages

Tuesday 26 January 2010

Republic Day..

Ok, to tell you the truth, I was craving to publish this poem on my blog for a long long time. I just didnt get the suitable moment to post it. Well, Today on the occasion of our 60th Republic Day, Im presenting the poem. I dont know who is the poet, but nevertheless, its a very good poem. I sincerely hope that we get some स्फुरण from the poem, and thereby strive for the betterment of our country as a whole. On this day, lets remember the glorious warriors who have strived to bring the country to where it is now. Its now our responsibility to bear the torch, and make the flame that is Bharat glow even more brighter. I hope the poem inspires one and all..



आम्ही पुत्र अमृताचे आम्ही पुत्र ह्या धारेचे
उजळून आज लावू भवितव्य मातृभूचे.

पृथ्वीस जिंकणारे आले अनेक येथे.
नाही निशाण त्यांचे उरले जगात कोठे.
गेली सहस्त्र वर्षे लढलो ना थांबताही
गझनी सिकंदराची उरली न मृत्तिका हि.
आम्ही काळपुत्र आम्हा येईल मरण कैसे!

हे राष्ट्र संकटांशी लढले अनेक वेळा
कोणी ना जिंकले हे, भासे अजेय काळा
आदर्श जीवनाचा हा वृक्ष अमर ह्याला
जरी तोडिले बळाने तरी स्पर्शितो नभाला
त्याचेच पुत्र आम्ही जयवंत हे सदाचे!

जरी काळ कूट प्यालो तरी नाही मृत्यू आम्हा.
अग्नीत पद्मिनी चा जळतो कधी ना आत्मा
दाहीर कन्यकाचे जरी देह आज नुरले.
आत्मे तरी त्यांचे अतिदिव्यारूप झाले.
ते प्राण आमुचे अन आम्ही प्राण या जगाचे!

ही चिन्मयी भारतभू जगतास ज्ञान देता
ही देव जन्मभूमी धर्मास ग्लानी येत
ही मूर्त अन्नपूर्णा जगतास पाळताना
जे काली रूप घेते दुष्टास शासताना
या माऊलीस अर्पू गुरुस्थान या जगाचे!


- Jai Hind, Vande Mataram.

No comments:

Post a Comment