Pages

Monday 2 April 2012

2 April 2011.

२ April २०११- हा दिवस इतर दिवसांपेक्षा फारच वेगळा, फारच महत्त्वाचा. खरोखर सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखाच.क्रिकेट प्रेमींसाठी तर नवे पर्व सुरु करण्यैत्काच मौल्यवान. त्या मागची करणे- तब्बल २८ वर्षांनी भारताने क्रिकेटचा विश्वचषक जिंकला होता. खरं सांगायचं तर हा दिवस आवर्णनीयच होता- पण अब्ज स्वप्न रंगविणाऱ्या त्या दिवसाचे वर्णन करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

भारतात दुर्दैवाने आज परिस्थिती अशी आहे की समाजातील घटक जातीय व प्रांतीय राजकारण करून देशाचे विभाजन करू पाहताहेत. " क्रिकेट" हा एकमेव धागा आहे, जो उभ्या हिंदुस्थानाला एकत्र आणतो. बाकी देशांमध्ये क्रिकेट हा खेळ आहे, परंतु भारतात क्रिकेट खरोखरच एक धर्म आहे. परंतु या धर्माचा मुकुटमणी - "वर्ल्ड कप"  १९८७ पासून भारतापासून दूरच होता! अनेक प्रामाणिक(९६,९९,२००३) व काही अप्रामाणिक (२००७) प्रयत्न पापण्यांमध्ये फक्त अश्रु सोडून गेले होते. १९९६ मध्ये कलकत्त्याची निराशा, २००३ मध्ये अंतिम सामन्यात पराभवाचा गिळलेला कडू घास, २००७ मध्ये Greg Chappel चा मूर्खपणा- या सर्व कटू आठवणी सतावत होत्या.

पण यंदा असे काही झाले नाही. अगदी सचिन, सेहवाग पासून नेहरा, मुनाफ पर्यंत टीमचे सगळे घटक उत्तम खेळले. सचिन,सेहवाग, कोहली व युवराज यांनी दमदार शतके ठोकली. झहीर एकापाठोपाठ एक असे बळी गिळंकृत करीत होता. क्षेत्ररक्षणामध्ये रैना, युवराज सज्ज होते. युवराज ने तर कमालीची खेळी केली. सेनापती धोनी कायम थंड होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जरी हार पत्करावी लागली असली, तरी इंग्लंडविरुद्ध टाय व हॉलंड, विंडीज, बांगलादेश व आयर्लंड विरुद्ध दमदार विजय मिळवून भारताने उपांत्यपूर्व फेरी गाठली.

उपांत्यपूर्व फेरीमध्ये भारताचा सामना - जगज्जेते ऑस्ट्रेलियाशी! जुना शत्रु! याच गानिमाने २००३ मध्ये १ अब्ज स्वप्न बेलगाम चिरडून काढली होती. आज सूड घ्यायचा दिवस उजाडला होता. कांगारूंना कापायला भारतीय तलवारी म्यानामध्ये तळपत होत्या. पहिले फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार व भारताचा पक्का वैरी - पोंटिंग-(भारतासाठी हा जल्लाद!) पुन्हा एकदा नडला व त्याने शतक मारले. पण पेटून उपसलेल्या भारतीय तलवारी रक्त प्यायल्याशिवाय शांत होत नाहीत. सचिन, गंभीर,युवराज व रैना यांनी कांगारूंवर जबरदस्त प्रतिहल्ला चढविला. १४ चेंडू राखून एक अविस्मरणीय विजय साकार केला. ऑस्ट्रेलिया चा १२ वर्षांचा क्रिकेटवरचा अंमल भारताने एका रात्रीत नष्ट केला. २००३ चा बदला पूर्ण झाला. विजयी चौकार मारल्यानंतर युवराजने सिंहगर्जनाच केली - "बोला-कोण येत आहे आता आम्हाला टक्कर द्यायला! नाही यमाकडे पाठविला, तर नावाचा युवराज नाही मी!". तळपणारी खड्ग कांगारूंचे रक्त पिऊन तृप्त झाली. गांगुली, द्रविड,कुंबळे, श्रीनाथ यांचा २००३ साली झालेला अपमान पुसला गेला! आता उपांत्य सामना रंगणार होता खुद्द पाकिस्तान विरुद्ध!

(युवराज ची सिंहगर्जना)

ऑस्ट्रेलिया चा पराभव झाल्यानंतर भारताला एकदाचे पराभूत करायचे असे मनसुबे आखत पाकिस्तानने उपांत्य सामन्याचा विडा भारताविरुद्ध उचलला. पाकिस्तान आणि भारत - एकाच आईच्या पोटी जन्मास आलेले दोन देश, पण पाकिस्तानातील धर्मांध प्रजा व भारताची जोरदार आगेकूच पाहून जाळणारे नेते, यामुळे पाकिस्तान ने भारताचे वारंवार जबर नुकसान केले. मानसिक डावपेच रचून,चहाड्या करून, भारताला बदनाम करू पाहणाऱ्या कुत्र्यांचा हा देश. या कुत्र्यांना नरकात देखील जागा नाही अशी त्यांची विचारसरणी. जुन्या शत्रुविरूद्धच सामना होता. क्रीडांगणाचे रणांगण होणार यात काही वादच नव्हते. २६ नोव्हेंबरला मंबई मध्ये हल्ला केलेल्या नामर्द हल्लेखोरांना त्यांची जगातली जागा दाखवून द्यायची ही पहिलीच संधी होती. बस्स!

नाणेफेक जिंकून भारताने पहिली फलंदाजी करायचे ठरवले. सचिनच्या ८५ च्या जोरावर एक अवघड-पण साधता येईल असे लक्ष गानिमापुढे ठेवले. ते कमी पडणार की काय असे वाटू लागले. परंतु सेनापती धोनीने आपले कौशल्य वापरून पाकिस्तानला चक्रव्युहात ओढले. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करून पाकिस्तानी धावगती रोखली. चहूबाजूंनी पाकिस्तानवर हल्ले केले. एक एक करून पाकिस्तानी शिलेदारांना हैराण करून तंबूत परत केले. पाकिस्तानची अवस्था अडकित्त्यात अडकलेल्या सुपारी सारखी झाली. त्यांनी व्युह फोडायचा प्रयत्न केला, पण ते करत असताना त्यांचा शेवटचा मोहरा- मिस्बाह भारताने पाडला- व या जन्मजात शत्रूचे सर्व मनसुबे पार धुळीला मिळविले. भारतात जल्लोष सुरु झाला. "हर हर महादेव" च्या गर्जना करीत भारतीय तरुण मध्यरात्रीच झेंडे, ढोल-ताशे घेऊन बाहेर आला. १ अब्ज हातांचा हा सुप्त नृसिंह ताडकन जागा झाला, व त्याने मोहालीत शत्रुचा कोथळाच बाहेर काढला. भारतात आतिषबाजी सुरु झाली. त्या लख्ख प्रकाशात पाकिस्तान आंधळा झाला. फटाक्याच्या, वाद्यांच्या व संगीताच्या त्या ध्वनिलहरी लाहोर, पेशावर,कराची, इस्लामाबाद या शहरांना कानठळ्या वाटू लागल्या- ती सर्व नगरे भारतीय डावपेचांमुळे बधीर झाली! या देशाकडे वक्रदृष्टीने पाहणाऱ्या सर्व शत्रूंना आम्ही रणांगणात असो व मैदानात- हाणणारच! आता प्रतीक्षा होती ती केवळ अंतिम सामन्याची!

१९८७ साली ऑस्ट्रेलियाने भारताचा मुकुट जिंकून घेतला होता. त्यांचाकडून तो पाकिस्तान, नंतर लंका असा गेला. पण ९९ मध्ये ऑस्ट्रेलिया ने तो पाकिस्तानला हरवून परत जिंकला होता व १२ वर्ष राखून ठेवला होता-व क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवले होते. श्रीलंकेने त्यांना नेहमीच लढाई दिली होती. परंतु २००७ मध्ये त्यांचा पूर्ण पराभव झाला होता. परंतु अत्यंत चांगला खेळ करून यावेळी सुद्धा लंका अंतिम सामन्यात पोहोचले होते. आता भारत आणि विश्वचषक या मध्ये फक्त लंका उभी होती. परंतु ही लंका रावणाची नसून संगा ची होती. पण लंका ती लांकच. रावणाने जसे सीतेस पळविले, तसेच आजची लंका भारताचा धर्ममुकुट त्यांच्या नजरेखालून चोरू पाहत होते. वेळ आली होती आता लंका दहनाची!

सामना रंगणार हे गृहीतच धरले होते. दोनीही संघांमध्ये महारथी होते. लंकेत जयवर्धने,मुरली, दिलशान आणि त्यांचा सेनापती संगा. भारताकडे सचिन, सेहवाग, युवराज आदि. पण मुंबई मध्ये खेळला जाणारा हा सामना कौशल्य, डावपेच व दवास्त्र(Dew factor) या वर जिंकला जाणार होता. अगदी सुरुवातीपासूनच लंकेने कूटनीती वापरण्यास सुरुवात केली. नाणेफेक हरल्यावर ऐकू आले नाही हे धोरण वापरून पुन्हा नाणेफेक करायचा रडीचा डाव साधला व तो जिंकून पहिले फलंदाजी करत दवास्त्रासारखे भेदक अस्त्र कूटनितिनी बळकावले. पण भारत खचला नाही. कर्णधार धोनीने अचूक चक्रव्यूह रचले व झहीरने भेदक मारा करीत लंकेस रखडले. परंतु महेला व संगा यांनी लंकेचा डाव सावरला. महेलाने चोख प्रत्युत्तर देत आपले शतक साधले, व भारतापुढे २७४ धावांचा डोंगर उभा केला. लक्ष अवघड होते कारण लंकेकडे दवास्त्र होते. आता भारत उत्तर कसे देणार याकडे सगळ्यांच्या नजरा फिरल्या.


लंकेचा धावांचा डोंगर फोडायला सेहवाग व सचिन हे महारथी उतरले. परंतु मलिंगाच्या भेदक माऱ्यापुढे ते जास्त काळ टिकू शकले नाही. दोन वीर एकापाठोपाठ एक सुरुवातीलाच पडले. भारताला चांगलाच धक्का बसला. आशा सुटणार की काय असे भय वाटू लागले. परंतु गंभीर व कोहली यांनी उत्तम खेळ करत डाव सावरला. पण डाव सावरतो न सावरतो,तोच कोहली बाद झाला! आता! वाढत्या दबावाखाली परत भारत ढासळणार असे वाटू लागले. १ कोटी लोक आपला जीव मुठीत धरून बसले. कोण या परिस्थितीचा सामना करणार? या अवघड कोंडीतून टीम ला बाहेर काढण्यासाठी खुद्द सेनापतीच मैदानात उतरला. लढाई चांगलीच अटीतटीची सुरु झाली. मिनिटामिनिटाला रणाचे रंग बदलंत होते. कधी लंकेचे पारडे जड होई, तर कधी भारताचे. अन तेवढ्यात घात झाला! गंभीर बाद झाला! शतकाला अवघ्या ३ धावा बाकी असताना गंभीर बाद झाला! लंकेचे पारडे चांगलेच जड झाले! आता मैदानात उतरला खुद्द युवराजच! पण तोवर सेनापतीने रणाची सर्व सूत्रे स्वतःच्या हाती घेतली होती. इतक्या जवळ आल्यावर तो मुकुट मिळवायचाच असेच ठरवले त्याने. लंकेच्या गोलंदाजांवर वाज्राघाती हल्ले चढवले. पाहता पाहता लंकेचा धावांचा डोंगर पोखरून निघाला, अन विजयासाठी फक्त ४ धावा राहिल्या! अन मग झाले- एका क्षणात झाले! भीमाने दुर्योधनाची मांडी फोडावी अशा घातकी तडाख्याने धोनीने जणू त्याची गदाच फिरवली व चेंडू सीमेपार केला! भारत जगज्जेता झाला होता!
अन..घराघरात भावनांना आळा घालून बसलेला भारतीयांचा आनंद एकदम आषाढघनासारखा बरसला! फटाक्यांची सरबत्ती सुरु झाली! मध्यरात्री बंदी असताना सुद्धा चाहु दिशातून रणवाद्ये घुमू लागली. अशावेळी झोप ती कोणाला येणार! एकाच आनंदात अवघा देश बुडाला! ९६,९९,२००३,२००७ मध्ये डोळ्यात अश्रु होते. आज पण अश्रु होते, पण ते आनंदाश्रु होते! ते गोड होते! ते सांडताना कोणतीही खंत नव्हती! अवघा हिंदुस्थान घरातून बाहेर पडला. विजयी घोषणा, ढोल-तशा-तुतारी यांनी रस्ते दुमदुमत होते! गल्लोगल्ली तिरंगा निर्धास्त नाचत होता. अवघा जनसागर रस्त्यांवर उतरला. काय पाहावे, काय बोलावे, काय ऐकावे, काय करावे, काहीच सुचत नवते. अवघे भारतीय या जनसागरातून उतू जाणाऱ्या आनंदात मनसोक्त भिजत होते... १९४७ नंतर बहुदा प्रथमच या प्रकारचे उधाण भारतातील रस्त्यारस्त्यावर उठले असावे... हा तर केवळ सुवर्णक्षण!




No comments:

Post a Comment