Pages

Monday, 10 October 2011

एक सूचना. ekdam manapasun.

माझा माझ्या रसिक वाचकांना नमस्कार. हा blog लिहायला तुम्हीच प्रेरणा ठरता. ही  प्रेरणा अशीच देत रहा हीच सदिच्छा आहे. पण सध्या काही घडामोडींमुळे खालील पोस्टसारखे स्फोटक पोस्ट लिहायला लागत आहेत. माझे सहकारी व मित्र श्रीयुत निखील सुग्वेकर, अमेय  अक्कलकोटकर व तेजस संत यांचा मला नक्कीच पाठींबा मिळेल यात काही वादच नाही. असो..
_-_o_o_o_-_

http://www.chinmay-datar.blogspot.com(Down the memory lanes...) हा ब्लॉग  माझ्या खासगी मलाकिचा आहे. हा blog जरी माझाच असला, तरी ह्यावरील कोणताही मजकूर चोरायची/छापायची इतर कोणालाही परवानगी नाही. (यासाठी कोणाची तशी नेमणूक पण केली नाहीये.) सध्या बरेच ठिकाणी माझे लेख- विशेष करून पुणेरी शुद्ध मराठी बोली वरचे(पुणेरी लिंगो), फॉरवर्डस म्हणून फिरतायत. यातली वाक्यांची उदाहरणे व झंप्या हे दोघेही माझ्या मनातून उत्पन्न झालेले विचार आहेत.  लेखक म्हणून मला झंप्या ची चोरी करून स्वतःच्या नावावर उदाहरणे खपवणारे लोक अशक्क्या डोक्यात जात आहेत.


तुम्हाला माझे लेख/मजकूर चोरणे सोपे वाटत असेल, पण माझ्यासाठी ते तितके सोपे नाही. मला काही लोकांनी हे लेख लिहायला स्पोन्सर केले आहे. माझे लेख, व त्यावर मिळणारे "हिट्स" याच्या आधारावर मला महिन्याला काही रक्कम मिळत असते. सध्याच्या वाढत्या महागाई मध्ये हि रक्कम मला खूप उपयोगी पडते.  तुम्ही माझ्याकडून परवानगी न घेता लेखामधील मजकूर स्वतःच्या फेसबुक/ ई-पत्रांमधून फिरवला, की  मला हिट्स कमी मिळतात, व माझे या मुळे आर्थिक नुकसान होते. तरी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की ह्या blog वरचा कोणताही मजकूर चोरू नये. अन्यथा कारवाई केली जाईल.


आत्तापर्यंत ज्यांनी मजकूर चोरी केलीये त्यांच्यासाठी (व जे चोरायचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी देखील):


१) लेख लिहायला मला वेळ आणि डोके दोनीही बरेच वापरावे लागते. उगीचच हवेतून हे लेख तयार होत नाहीत. 
२) तुमचे तीर्थरूप मला लेख लिहायला मदत करीत नाहीत- जे लोक मदत करतात, त्यांचा योग्य ठिकाणी उल्लेख असतो.
३) तुमच्या या चोरीमुळे माझे जे आर्थिक नुकसान होते, ते तुमचे तीर्थरूप भरून देणार आहेत का? ( महिन्याचे साधारण २०० डॉलर्स)
४) आय. टी क्षेत्रातील लोक व अमेरिकेत बसून खादाडी करणारे लोक यांनी मजकूर चोरी केल्याचे आढळून आल्यास त्यांच्याकडून दुप्पट दंड आकारण्यात येईल.
५) मजकूर चोरी- "plagiarism" हा एक गुन्हा आहे. मी पोलिसांकडे तक्रार केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. 
६) ज्या अर्थी आपण माझे हे ब्लोग्स वाचताय, त्या अर्थी आपण नक्कीच सुजाण व सुशिक्षित आहात, यात काही शंकाच नाही. तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांकडून कोणत्याही प्रकारची चोरी/ छपाई अपेक्षित नाही. झाली असल्यास मला तुम्हाला सुशिक्षित म्हणायची लाज वाटते.
७) आज तुम्ही मजकूर चोरी करताय, उद्या लोकांचे विचार, पैसे यांची चोरी कराल. असे झाल्यास तुमच्यात आणि कॉंग्रेस सरकार मध्ये काहीच फरक राहत नाही. आपली लायकी कॉंग्रेस सरकार सारखीच, हे कृपा करुन दाखवून देऊ नये.
८) मजकूर चोरी टाळायला माझ्या blog ची लिंक "share" करावी. यांनी तुम्हाला पण फॉरवर्ड पाठवता येतील, मला पण हिट्स मिळतील, व तुम्हाला पण माझ्या मित्रांनी  (सुग्वेकर, अक्कलकोटकर व  संत) तुमच्यावर लावलेला चोरीचा आळ टाळता येईल.

एक लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारची चोरी, ती मजकुरातील असो शाब्दिक असो वा वैचारिक असो, खपून घेतली जाणार नाही, व योग्य ती कारवाई केली जाईल.

- हे असे का लिहिले आहे असे विचारल्यास सणसणीत कानाखाली बसेल.
- या पुढे जे कोण blog ची चोरी करेल, माझा व माझ्या सहकार्यांचा उल्लेख न करता, आम्हाला न विचारता कोणताही पोस्ट  इकडे तिकडे स्वतःच्या नावावर खापवेल, त्याचे आर्थिक नुकसान तर होईल याची नोंद घ्यावी.
हुकुमावरून.

- चिन्मय अनिल दातार. ( blog चे मालक)
सदाशिव पेठ, पुणे ३०.

8 comments:

 1. chori tuzya dhyanat koni aanun dili (i.e. me) yancha reference dilach nahi :P

  ReplyDelete
 2. Tuzya nawala, aadnawala ani pattyala ( sadashive peth puen 30 :D) sajeshi bhasha ahe tuzi... uttam.. abhiman watala.... :) asech uttam uttam lihit raha...( aaj pahilyandach tuzya blog la bhet dili ahe .. nahi tar tula watel.. junya ch batmya sangate hi ) :)

  ReplyDelete
 3. hehe! priyanka tai! thanks!! :D aga asalihilyashivay lokanna kalat nahi!

  Akkal.. tuze abhaar ahet! lihilay tuza naav ata! :P

  ReplyDelete
 4. Mitra..................apratim lihila ahes re........
  tuzya mhannyashi me sahamat ahe..........
  Aaplya Aadnavala, Sadashiv Pthela Jaglas re........Bhari!!!!

  ReplyDelete
 5. He avadlay majjor...
  Kadhi na kadhi garaj hoti copyright chi Chinya...
  Lekh jamlay khara !

  ReplyDelete
 6. Kadak hota are he.....Btw copyright kasa kelas?...ithe nahi tar mail var kalav....ha copyright karnyachi vel yenyasathi tujhya itka changla lihava lagel adhi.

  ReplyDelete
  Replies
  1. tula pan copyright karun ghyaychi garaj ahe are! changla lihitoys tu!

   Delete
 7. Jamlela ahe! Ani zie translation should be ready by tomorrow :) I expect a tutorial and some more help on AdSense once thats done.

  ReplyDelete